अर्ध्या तासात ऑपरेशनला सुरुवात होणार होती. डॉ. संतोष साने आपल्या टीमसोबत ऑपरेशनच्या तयारीबद्दल बोलत होते. “सर्व तयारी झाली आहे का ?” डॉ. साने म्हणाले.“हो सर ” डॉ. शेरणे म्हणाला.“पेशंटसोबत त्यांच्या कुटुंबापैकी कोण आल आहे ” साने हातातील फाईल बघत म्हणाले.“कोण-कोण आल आहे विचारा ” डॉ. सुभदा म्हणाली.“म्हणजे ?” फाइल खाली ठेवत साने म्हणाले.“त्यांचं… Continue reading हॅलो डॉक्टर
मला पसंद आहे!
आरश्यासमोर उभा राहून दिनेश नव्या कपड्यांवर स्प्रे मारत होता. त्या स्प्रेच्या वासाने हॉलमध्ये बसलेल्या माधवला खोकला लागला. “किती स्प्रे मारत आहेस. खिडक्या उघड्या करून मार “, हॉलमधील असलेला स्लायडर सरकवत माधव म्हणाला. फॅनची स्पीड वाढवण्यासाठी तो गोलाकार बटन फिरवू लागला. पण फॅनची स्पीड आहे तिच होती. “फॅनची स्पीड का वाढत नाही?” “ती नाही वाढत दोन… Continue reading मला पसंद आहे!
पलायन
येरवडा काराग्रहातील सायरन वाजू लागला. पदावर नवीन रुजू झालेले जेलर दीपक दिक्षित तातडीने सुरक्षारक्षकासोबत मीटिंग घेऊन बोलत होते. “हे दोघे पळून कसे गेले ?” “ह्या दोघांनी अगोदरपण एकदा प्रयत्न केला होता. पण..” दिवेकर म्हणाले “पण काय ” “देसाई सर यांची खास नजर होती यांच्यावर. म्हणजे तसे सर्व कैद्यांची माहिती त्यांना इतके वर्ष राहून झाली होती.… Continue reading पलायन
MIDC करंदवाडी
सक्षमच्या घरी कंपनी जॉइन करण्याच पत्र आल होतं. घरच्यांना आणि शेजार्यांना पेढे वाटून तो जाण्याची तयारी करू लागला. आजी मात्र त्याच्या जाण्याने खुश नव्हती. लहान भावाने सायकल स्वछ धुवून काढली होती. “केशव “, आईचा आवाज एकल्यावर पुसण्याचा कापड अर्धवट खाली टाकून तो तिकडं गेला. सायकलच चाक जोरात फिरत होत. त्या फिरण्यामुळे डबल स्टँडवर उभी असलेली… Continue reading MIDC करंदवाडी
निसर्ग राजा
मुंबई-पुणे हायवेवर विक्रम सुसाट कार चालवत होता. सीट-बेल्ट न लावल्यामुळे अधून-मधून बीप-बीप आवाज येत होता. “अरे, ते लाव ना सीट बेल्ट “, डोक्याला हात लावून बसलेला प्रणव कान झाकत म्हणाला. “हे घे, लाव “, विक्रमने उजव्या हाताने सीट-बेल्ट खेचत पुढे झाला. वायपर पूर्ण वेगात असून देखील काचेवर पाणी कायम राहत होत. “समोर पोलिस आहेत टोल-नाक्यावर,… Continue reading निसर्ग राजा
ऑफिस
शनिवार असून देखील अशोक आज लवकर उठला होता. रात्री नेटफ्लिक्सवर सिरीज बघून तसाच बेडवर ठेवलेला लॅपटॉप त्याने ऑफिसच्या बॅगमध्ये घातला. लॅपटॉपची बॅग एका खांद्यावर घेत तो हॉलमध्ये गेला. बॅचलर असल्यामुळे तो एकटाच त्या फ्लॅटवर राहत असे. टेबलावर असलेली बाईकची चावी आणि हेलमेट त्याने घेतल. चप्पल स्टँडजवळ गेल्यावर त्याने जोरात दोन्ही शूजला पायाने सरकवल, त्यापैकी एक… Continue reading ऑफिस
बक्षीस
मुवर्स आणि पकर्सची गाडी सोसायटीत आली होती. विनोद गाडी भोवती एक फेरी मारून विचार करतो की ह्या टेम्पोमध्ये सर्व सामान बसेल की नाही, परत दोन फेर्या तर नाही होणार ? “एका फेरीमध्ये सर्व सामान जाईल का ?” मोबाईलवरील मेल पाहत तो ड्रायवरला विचारतो. ड्रायवर उजव्या खिशातून घडी पडलेला कार्बन कॉपीचा कागद पूर्ण उकलून पाहतो. “हो… Continue reading बक्षीस
हॅप्पी बर्थडे
११:४५ वाजले होते. चांदनी चौकाच्या सीसीडीमध्ये आता शुकशुकाट होता. स्टाफ आता क्लोझिंगच्या तयारीत होते. काऊंटरवरील स्टाफ दिवसभरच्या बिलांची जमवाजमव करत होता. त्याच्यासमोरच रिया आणि अनिकेत बसले होते. रिया ब्लॅक कोटमधून मोबाइल काढून बघते आणि मनात विचार करते अजय आणि दिनेशला अजून किती वेळ लागेल. “काय झालं रिया”, अनिकेत डाव्या हातात कॉफी घेत म्हणतो. “काही नाही”,… Continue reading हॅप्पी बर्थडे
पहिलं इंटरव्ह्यु
निकाल लागून आणि पुण्यात येऊन १ आठवडा झाला होता. मी लॅपटॉपवर मूव्ही बघत बसलो होतो. कालच अप्लाय केलेल्या जॉब सर्च साईटवरुन मेल आला की उद्या इंटरव्ह्युसाठी या म्हणून. लगेचच कपाटात फॉर्मल ड्रेस आहेत की बघायला लागलो. पाच सहा टीशर्ट आणि पॅन्ट दिसले. दारामागे चेक केलो तर तिथे काल मॉलला घालून गेलेला तपकिरी रंगाचा शर्ट आणि… Continue reading पहिलं इंटरव्ह्यु